नहीं जायेंगे काम को, तो क्या खायेंगे शाम को? कोपरगावात व्यापाऱ्यांचे अभिनव आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरानाचे प्रसाराला छोटे व्यापारीच जबाबदार कसे?, नहीं जायेंगे काम को, तो क्या खायेंगे शाम को?, आम्ही नाही मोठे आम्ही आहोत छोटे, शासनाने विचार करावा,

ऑनलाईन खरेदी चालू, अन आमचे दुकाने बंद???, अशा घोषणा असलेले फलक हाती घेऊन सविनय कायदे पालन करत

तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून घोषणा न देता किंवा जमावबंदीचा भंग न करता आपापल्या दुकानासमोर निषेध फलक हातात धरून शनिवारी कोपरगाव शहरातील दुकानदारांनी अभिनव आंदोलन केले.

राज्य शासनाने केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने अिभनव आंदोलनाचे आवाहन केले होते.

यानुसार कोपरगाव शहरातील दुकानदारांनी हे अभिनव आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते, शेतकरी, बड्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते.

त्याला आमचा विरोध नाही, परंतु छोट्या व्यापाऱ्यांनाही लॉकडाऊन भत्ता सरकारने चालू करावा, त्यानंतरच आम्हाला दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावे,

अशी प्रतिक्रिया कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना शासनाने छोट्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. गेले वर्षभर छोट्या व्यापाऱ्यांची लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळी सोसल्या आहेत.

आता पुन्हा छोट्या दुकानदारांवर अन्याय करण्याच्या या धोरणाचा आम्ही निषेध करीत आहोत. यावेळी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे नरेंद्र कुर्लेकर, सत्येन मुंदडा,

नारायण अग्रवाल, चांगदेव शिरोडे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, स्टेशनरी असोसिएशनचे रमेश शिरोडे, उल्हास गवारे,निलेश मुंदडा, महावीर सोनी,

तिलक अरोरा यांचेसह कोपरगाव व्यापारी समितीचे अकबर शेख व संघर्ष समितीचे अंकुश वाघ, शरद खरात आदींनी लॉकडाऊनचा निषेध व्यक्त केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24