अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील सर्व याचा अर्थ दुकाने आणि व्यवहार असा ढोबळ मनाने आहे.
लग्न, अत्यंविधी, अन्य कार्यक्रम आणि धार्मिक स्थळे यासंबंधी काही बंधने असणार आहेतच.ती कोणती असतील याबद्दल लवकरच सविस्तर आदेश काढला जाईल.
दुकाने आणि अन्य व्यवहार सुरळीत सुरू :- मुश्रीफ आज अहमदनगर येथे आले होते.त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा निकषांनुसार पहिल्या टप्प्यात येत असल्याने सोमवारपासून सर्वकाही खुले होणार असल्याचे जाहीर केले.
धार्मिक स्थळे आणि इतर गोष्टींचे काय होणार, याबद्दल विचारले असता, ‘सध्या तरी दुकाने आणि अन्य व्यवहार सुरळीत सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे.
काळजी घ्यावीच लागणार :- आता आपण लेव्हल एकमध्ये आलो असलो तरी पुन्हा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घ्यावीच लागणार आहे.
त्यामुळे धार्मिक स्थळे, लग्न समारंभ, अंत्यविधी, अन्य सभा, कार्यक्रम अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांबद्दल काय निर्णय घ्यायचा, तो विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी यासंबंधीच्या परिस्थितीचे अवलोकन करून सविस्तर आदेश काढतील. यामध्ये या सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असे मुश्रीफ यांनी सांगितले.