अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसू लागल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासन अनेक कठोर नियम घेत आहे.
यातच जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवायच्या का नाही यासाठी जिल्हा शल्यचिकिल्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्याबाबत तीन दिवसामध्ये निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यातून हद्दपार होणार कोरोना फेब्रुवारीच्या शेवटाला पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच लग्न समारंभाला होणारी गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल यामुळे जिल्ह्यात करोना रूग्ण वाढत आहेत.
यावर निर्बंध आणण्यासाठी कडक उपाय योजना करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. वाढत्या करोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्यासोबत सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.