अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात तब्बल १०२ दिवस फरार असलेल्या मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली यानंतर अहमदनगर पोलिसांच्या हा कामगिरी बद्दल कौतुक होत आहे. दरम्यान आता लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनाही अटक होणार आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी नगर अर्बन बँकेच्या ११ माजी संचालकांना जबाबासाठी बोलवले होते. यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह ११ जणांचा यामध्ये समावेश होता. यातील फक्त एका संचालकाने आपले लेखी म्हणणे मांडले आहे.
उर्वरीत १० जणांनी दोन वेळा संधी देऊन सुद्धा ते हजर न झाल्यामुळे आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुढील कारवाई सुरू केलेली आहे आता यांचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके पाठविण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ज्यावेळेला या घटनेचा तपास सुरू केला होता तेव्हापासूनच माजी संचालक हे नगरमधून फरार झाले होते त्यांच्या घरावर जबाबाचे नोटीस देखील चिकटवली होती, तरीही हे हजर राहिले नाहीत.
त्यामुळे आता त्यांची धरपकड सुरू होणार असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे हे निष्पन्न व्हायचे आहे.
अनेकांना चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच तीन कोटी रुपये बँकेमध्ये जमा न होता त्यांनी धनादेश किती रकमेचा वाटला याचा शोध घ्यायचा आहे, पोलीस अन्य ठिकाणी शोध घेत आहेत.
काही कागदपत्रे हस्तगत करायची आहेत व काही व्हॉउचर सुद्धा अजून हस्तगत करायचे आहेत तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद सोमवारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने न्यायालयामध्ये करण्यात आला आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दिनांक २० तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.