अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- शिवशाहीर, महाराष्ट्र भूषण व पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचा ऐतिहासिक आधारवड हरपला आहे.
स्व. बाबासाहेब पुरंदरे व नगरचे अतूट नाते होते. 1999 व 2014 साली ‘जाणता राजा’ महानाट्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा सहवास मला लाभला.
त्यांच्या प्रगल्भ विचाराने प्रेरणा मिळाली. नगर शहरात त्यांचे आगमन झाल्यावर साक्षात शिवसृष्टीच नगरमध्ये अवतरत असे. त्यांच्या शिवचरित्राच्या माध्यमातून डोळ्यासमोर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज उभे राहायचे.
आता असे थोर व्यक्तिमत्वास तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा उचित सन्मानच केला होता,
अशा शब्दांत पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन, दीनदयाळ परिवाराचे संस्थापक व भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी स्व. पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली.