अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही.
आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना लगावला.
काँग्रेसचे पदाधिकारी काळे यांनी पत्रकार परिषदेत आमदार जगताप यांच्यावर विविध आरोप केले. त्याबाबत बोलताना जहागीरदार म्हणाले, चार पक्ष फिरून आलेला तो कार्यकर्ता आहे. आमदार जगताप हे सुशिक्षित आहेत. काळे यांना त्यांची जागा यापूर्वीच आम्ही दाखवली आहे.
आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. लोकशाही आहे, पण तुम्ही लोकांसाठी काही तरी काम केले पाहिजे, पण त्यांनी फक्त काड्या केल्या. आमदार जगतापांनी प्रथम कोविड सेंटर उभे केले, रात्रं-दिवस आमची टीम काम करत आहे.
परंतु आम्हाला त्रास देऊन ते स्टंटबाजी करत आहेत. त्यांना आम्ही फार महत्त्व देत नाही. काळे यांनी केलेले सर्व आरोप खोटे व स्टंटबाजीसाठीचे आहेत, असे जहागीरदार म्हणाले.