महिलेची पुलावरून उडी मारुन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- महिलेने प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.

शहरातील नवीन नगररोड परिसरातील पाठक हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या रोहिणी भगवान काळे (वय ५६) ही महिला सकाळी घराच्या बाहेर पडली होती.

घरातील कचरा टाकण्याचे निमित्त करून सदर महिला घराच्या बाहेर गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरालगतच्या प्रवरा नदी पुलाखाली तिचा मृतदेह आढळला.

याबाबत पोलिसांना माहिती समजतात पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी सदर महिलेला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करीत आहे. सदर महिलेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24