महिलेचा झाला अपघातात मृत्यू पती म्हणाले मृत्युला प्रशासन जबाबदार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजारवर बंदी असूनही श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्गवर बाजार भरल्यामुळे गर्दी झाली होती.

याच गर्दीत बाजार करून पतीबरोबर मोटारसायकलवरून घरी जात असताना दुधाच्या टँकरची धडक बसून एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. बाजार भरविण्यास बंदी असूनही श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर बाजार भरला.

या बाजारात बाजार करून पती-पत्नी मोटार सायकलवरून घरी निघाले होते. त्याच दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला (नंबर एमएच १७ सीई ३४३३) दुधाच्या टँकरची (एमएच १७ बीवाय ६६८०) धडक बसली.

या अपघातात मोटार सायकलवरील महिला खाली पडल्याने टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात निर्मला बाबासाहेब बुट्टे (वय ५८, राहणार खानापूर) या जागीच ठार झाल्या आहे.

त्यांच्या मृत्युला प्रशासन जबाबदार असल्याची टिका त्यांचे पती बाळासाहेब बुट्टे यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24