अहमदनगर शहरात अपघातात महिला ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर शहरातील तारकपूर बसस्टॅंडनजिक भरधाव वेगातील वाहनाने जोराची धडक दिल्याने महिला ठार झाली आहे.

जोहुर पिरमोहंमद शेख असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. अशपाक पिरमहंमद शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार श्रेयश सुनिल इवळे (रा. भिंगार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना २८ जानेवारी रोजी घडली असून ९ फेब्रुवारीला गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. केदार हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24