महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन न करता दाद मागितली पाहिजे. न्याय नक्की मिळेल. महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महिलांना १०० टक्के न्याव देण्याची आयोगाची भुमिका राहिली आहे.
समाजानेही महिला दिनीच महिलांचे गुणगान न करता महिलांचा दररोज आदर, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले. सावेडी उपनगरात संदेशनगर येथील साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन कुटूंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी चाकणकर बोलत होत्या.
याप्रसंगी आ. संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रामाणिक विधाते, अभिजित खोसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे आदिंसह महिला उपस्थित होत्या.
कर्तृत्ववान महिलांचा तसेच बचत गटाच्या १६७ महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक, संस्थांतील कर्मयोगिनी महिलांमध्ये स्रेहालय बालगृहातील जयश्री शिंदे, आश्विनी दोरवडे, दिपाली झांजड, आश्विनी आढाव,
पौर्णिमा माने, सुमन कांबळे, शुभांगी झेंडे, सुजाता खेडकर, जया पालवे, क्रांती पोळ, शबाना शेख आदिं महिलांचा साई प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केले तर आभा योगेश पिंपळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.