अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका महिला सरपंचाला तंटामुक्ती अध्यक्ष निवडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत तब्बल आठ जणांनी मिळून जबर मारहाण करत शिवीगाळ केल्या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विनयभंगासह जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एक महिला सरपंच यांनी निवडुन आल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार आज दि.८ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली. मात्र या ग्रामसभेमध्ये तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ करण्यात आला.
या गोंधळात महिला सरपंचाला विलास तुकाराम महाडिक, राहूल सोपान महाडिक, नितीन सोपान महाडिक,संकेत भिमक महाडिक, अनिल दशरथ महाडिक, राजू बाबुराव कातोरे, दशरथ बापुराव कातोरे,
दिलीप कौशिराम कातोरे या आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळ करत दमदाटी करत.जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत त्या महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ए सी बारवकर हे करत आहेत.