अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- महिला दिनाच्या निमित्ताने जगात महिलांचा सन्मान होत असताना नारायणवाडी येथे मात्र चक्क महिला उपसरपंचाला मारहाण करण्याची घटना घडली आहे.
नारायणवाडी येथील उपसरपंच अश्विनी पेटे व त्यांचे पती प्रमोद पेटे यांना ग्रामपंचायत आवारात मारहाण करण्यात आली. याबाबत प्रमोद रावसाहेब पेटे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे.
माझी पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आली आहे व सध्या नारायणवाडी ग्रामपंचायत येथे उपसरपंच आहे. मी व माझी पत्नी गावातील ग्रामपंचायतच्या कामानिमीत्त ग्रामपंचायत कार्यालयात गेलो होतो.
त्यावेळी गावातील मधुकर आसाराम कंठाळे व अशोक गोरक्षनाथ कंठाळे (दोघे रा. नारायणवाडी, ता. नेवासा) हे दोघे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मोठमोठयाने शिवीगाळ करु लागले.
त्यावेळी ते दारु पिलेले होते. मी त्यांना समजावुन सांगत होतो, की कार्यालयात महिला आहे. तुम्ही शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्याचा त्यांना राग आला. त्यावेळी त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यानंतर मी ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर आलो व ग्रामपंचायतच्या आवारात उभा राहीलो.
त्यावेळी दोघांनी मला मारहाण केली. मारहाणीमध्ये मार लागल्याने मी जोरजोरात ओरडलो. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात असलेली माझी पत्नी व नाना हरिभाऊ धनक (रा. नारायणवाडी) यांनी मला त्यांच्या तावडीतुन सोडविले.
त्यावेळी वैशाली अशोक कंठाळे ही भांडणाचा आवाज ऐकुन तेथे आली व तिने माझी पत्नी अश्विनी हिस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच मधुकर असाराम कंठाळे यानेही माझ्या पत्नीला मारहाण केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. रेवणनाथ लगड हे करत आहेत.