अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- संगमनेर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी के महिला आली होती. यावेळी तिच्या पतीने चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्राजक्ता गणेश गायकवाड ही महिला पती गणेश गायकवाड याच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आली होती.
त्यावेळी तिचा पती गणेश गायकवाड हा देखील तेथे आला. पोलीस ठाण्यात त्याने आरडाओरड सुरू केली. ‘मला माझी मुलगी माझ्या ताब्यात दे’ असे तो ओरडत होता. पोलीस त्याला समजावून सांगत होते. मात्र, त्याचे ओरडणे सुरूच होते.
त्यानंतर तो तेथून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा पोलीस ठाण्यात आला असता त्याच्या हातात एक बाटली होती. त्या बाटलीतील द्रव पदार्थ त्याने अंगावर ओतून घेतले. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेचच त्याच्याकडे धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
व पुढील मोठा अनर्थ टाळला. याप्रकरणी गणेश चंद्रभान गायकवाड (वय ३१, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.