अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिलांचे सबलीकरण व्हावे याकरिता या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
अनेकदा महिलांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांची पुरेशी माहिती नसल्याने नुकसान होते. यंदा महिला दिनाचं सेलिब्रेशन करताना केवळ आनंद शेअर करू नका तर त्यासोबतीनेच महिलांना त्यांचे हक्क ठाऊक असणं अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कायदेशीर तरतुदींची माहिती असणंदेखील आवश्यक आहे. म्हणूनच महिलांना असलेल्या विशेष अधिकारांबद्दल वेळीच जाणून घ्या.
महिलांना असलेले विशेष अधिकार :- सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना अटक होऊ शकत नाही. महिलांना सूर्यास्तानंतर किंवा सुर्योदयापूर्वी अटक होऊ शकत नाही.
काही अपवादात्मक स्थितीमध्ये तसे करायचे झाल्यास न्यायालयाकडून संबंधित परवानगी असणं आवश्यक आहे.
कोठेही FIR करण्याची सोय :- शक्यतो जेथे गुन्हा घडतो तेथेच तक्रारदारांनी FIR दाखल करावी असा नियम आहे. मात्र महिला तक्रारदार याला अपवाद आहेत. आरोपी मोकाट सुटू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयानेच महिलांना शक्य तेथे जवळच्या पोलिस स्थानकामध्ये FIR दाखल करण्याची सोय दिली आहे. नंतर FIR संबंधित पोलिस स्थानकांमध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते.
तर आवाज उठवा :- कामाच्या ठिकाणी त्रास किंवा कोणताही लैंगिक छळ झाल्यास त्याची तक्रार दाखल करण्याची सोय आहे.
घरगुती अत्याचाराविरूद्ध आवाज :- घरामध्ये रहाणारी स्त्री मग ती पत्नी, बहीण, लिव्ह इन पार्टनरमधील महिला किंवा हाऊसवाईफ जर तिला लैंगिक, आर्थिक, शाब्दीक आणि मानसिक अत्याचार होत असल्यास दाद मागू शकते.
लैंगिक अत्याचारामध्ये ओळख निनावी ठेवण्याची सोय :- लैंगिक अत्याचारामध्ये संबंधित पीडित महिलेची ओळख गुप्त ठेवण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. यामध्ये महिला पोलिस ऑफिसरच्या समोर तक्रार करण्याची मुभा आहे.
‘पाळत’ ठेवल्याची तक्रार करण्याची सोय :- Iजर एखादी व्यक्ती (स्त्री / पुरूष) महिलेला जबरदस्ती काही वैयक्तित संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्यास, त्याच्याविरूद्ध तक्रार करण्याची सोय आहे.
मोफत कायदेशीर सल्ला :- अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित पीडित महिलेला कायदेशीर मदत आणि वकील मोफत पुरवण्याची सोय आहे.
समान मोबदला :- कामाच्या ठिकाणी मोबादला देताना स्त्री आणि पुरूष असा भेदभाव करता येऊ शकत नाही. एखादं काम करताना पुरूषाला जितका मोबदला असतो तितकाच मोबदला स्त्रीलादेखील देणं बंधनकारक आहे.