अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत आहे. मात्र ‘वर्क फ्रॉम होम’ हे तरी कंपन्यांच्या चांगलेच पथ्यावर पडले आहे.
एका अहवालानुसार या कंपन्यांचे वर्षभरात हजारो कोटी रुपये वाचले आहेत. गुगलने ‘वर्क फ्रॉम होम’मुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले आहेत. कोरोना मुळे गुगलचे कर्मचारी वर्षभरापासून घरुनच काम करीत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने पदोन्नती आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला २६८ मिलियन डॉलर म्हणजेच १९८० कोटी रुपये वाचवता आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे कोरोनामुळे शक्य झाले आहे.
दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर १ बिलियन डॉलर म्हणजेच ७ हजार ४०० कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण पैसा कंपनीचा वाचला आहे.
महामारीमुळे अनेक सेक्टरला फटका बसला आहे, हे आपण अनेकदा वाचले, ऐकले आहे. परंतु, या दरम्यान इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे गुगलला अच्छे दिन पाहायला मिळाले. गुगलचा महसूल जवळपास ३४ टक्के वाचला आहे.