अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- मानोरी- केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या मुळानदी वरील बंधाऱ्याशेजारील कोसळलेल्या पुलाची पाटबंधारे विभागाकडुन पहाणी करण्यात आली असुन लवकरच हे काम सुरू करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले आहे.

बुधवारी या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडुन तसेच नागरीकांकडुन या पडलेल्या पुलाची पहाणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभीयंता आण्णासाहेब आंधळे,शाखा अभियंता शरद कांबळे आदिंसह अधिकारी पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली आहे.

मानोरी-केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील बंधारा शेजारील हा पूल गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल अखेर कोसळला होता.

लवकर काम सुरू होणार अहल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी मा.उपसभापती रविंद्र आढाव,सरपंच आब्बास शेख,आण्णासाहेब तोडमल,उत्तम खुळे,गोकुळदास आढाव,चाॅदभाई शेख,शामराव आढाव, लक्ष्मण आढाव, राजेंद्र आढाव,पंढरीनाथ आढाव,शिवाजी आढाव ,उद्धव आढाव,गोरक्षनाथ गुंड, आदिंसह नागरीक उपस्थित होते.

पाहणी करण्यात आलेल्या ठिकाणी सायली पाटील यांच्याशी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून येथील वस्तुस्थिती दृष्टीने माहिती घेतली आणि कामाला गती द्यावी अशा सूचना केल्या.