अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जवळे येथील सिद्धेश्वर कोणतीही शासकीय परवानगी न घेता विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रकरणी आक्रमक पणा स्वीकारत १५ सप्टेंबरपासून विहिरीजवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामस्थ भाऊसाहेब आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकात केले आहे.
याप्रकरणी सर्विस्तर माहिती अशी कि, जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये महादेव मंदिरातलगत सहा महिन्यांपूर्वी खोदकाम करून बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही.
त्यासाठी निविदाही काढलेली नाही. यामध्ये जनतेपेक्षा स्वतःचे हित पाहिल्याचे लक्षात येते, असा आरोप जवळे (ता. पारनेर) येथील ग्रामस्थ भाऊसाहेब प्रकाश आढाव यांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने खोदलेल्या विहिरीपासूनच पन्नास-साठ फुटांवर गावातील सांडपाणी जात आहे.
त्यामुळे आज नाही तरी भविष्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा विचार ग्रामपंचायतीने यापूर्वीच करायला हवा होता. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा शासकीय अहवालही प्राप्त झालेला आहे. १५ सप्टेंबरपासून विहिरीजवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.