अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोल्हार खुर्द हायवे रस्त्यावर सी.एन.जी.पाईपलाईनचे खोदकाम करता असतांना एका कामगाराचा मृत्यू झाला.
या मृत्यूची चौकशी होवून संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, युवा शहराध्यक्ष संदिप वाघमारे, शहराध्यक्ष हरिष आल्हाट, राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, उपाध्यक्ष रमेश पळघडमल आदि उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार खुर्द येथे नगर- मनमाड रस्त्यावर सी.एम.जी. पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम करतांना नागेश प्रकाश नायक या परप्रांतिय कर्मचार्यांचा मातीच्या ठिगार्याखाली दबून मृत्यू झाला.
सदर घटना ही दि.16 सप्टेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यात घडली. सदर कामगारास राहाता तालुक्यातील पीएमटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पी.एम. करुन सदर मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यात आला.
याबाबत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. तरी सदर घटनेस जबाबदार असणार्या ठेकेदार व सुपर वायझरवर मनुष्य वधावा गुन्हा दाखल करुन ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे.
तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)च्यावतीने राहुरी पोलिस स्टेशन येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपअधिक्षक श्रीरामपूर, तहसिलदार राहूरी, पोलिस निरिक्षक राहूरी यांना देण्यात आल्या आहेत.