कारच्या धडकेत मजुराचा मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- कारने एका मजुरास जोराची धडक दिली यामध्ये मजूर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

हा अपघात संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब शिवारातील रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यावर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान सदाशिव चौकल्ले (वय 55, रा.ता.लोहा, जि.नांदेड) हे बोअरवेलच्या गाडीवर मजूर म्हणून काम करत होते.

शुक्रवारी पहाटे संगमनेर येथून बोअरवेलची गाडी साकूर फाटा मार्गे रणखांबकडे जात होती. दरम्यान, ही गाडी रणखांब ते कौठे मलकापूर रस्त्यावर आली असता काही कारणास्तव रस्त्याच्या कडेला थांबली.

त्यावेळी मजूर भगवान चौकल्ले हे गाडीच्या खाली उतरुन लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेले. त्याचवेळी वेगाने आलेल्या कारने (क्रमांक एमएच.17, एजे.3481) मजूर चौकल्ले यांना जोराची धडक दिली.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. या प्रकरणी मनमथ बाबुराव वड्डे (रा.देवणीवाडी, ता.लोहा, जि.नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24