अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेल्या पाच वर्षातील थकीत पगार मिळविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असुन त्या संदर्भातील बैठकीत बारा दिवसाच्या आत व्यवस्थापकीय संचालक मंडळाने थकीत पगारा बाबत निर्णय न दिल्यास उपोषण करण्याचा निर्णय कामगार बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरवारी सकाळी कामगार, सेवानिवृत्त कामगार यांची एकञित बैठक घेण्यात आली.या बैठकीत कामगार पगार व इतर देणी या संदर्भात चर्चा करण्यात आली. कामगार बैठकीत इंद्रभान पेरणे यांनी मनोगत व्यक्त करताना परखड टिका केली.
कारखान्यात सत्ता भोगणाऱ्या नेतृत्वाच्या चुका मुळे कामगार भिकेला लागला आहे.संचालक मंडळाने जबाबदारी पार पाडावी.कामगार नेते संचालक मंडळाच्या दारात जावून भिकमागो आंदोलन करणारे कामगार नेते कुठे आहे.युनिय पदाधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात येत आहे.
प्रवरेच्या कामगाराचा राहुरीच्या युनियशी काय संबध आहे.प्रवरेच्या कामगारांना पगार,राहुरीच्या कामगारावर अन्याय का? संचालक मंडळ कामगारांची पिळवणूक का करत आहे.आंदोलन करण्यापुर्वी कामगारांनी शनिदेवावर हाथ ठेवावा.ज्या कामगार नेत्यांनी संचालक मंडळाशी समझोता करुन कामगारांची देणी थकविली त्यांनी नेतृत्व करण्याच्या भानगडीत पडू नये.
वेळप्रसंगी संपत्ती विका पण कामगारांची थकीत देणी द्या.कामगारांना कोणाचेही चारीञ हरण करायचे नाही.असे पेरणे यांनी सांगितले. कामगार बैठकीत चंद्रकांत कराळे,सुरेश थोरात, सचिन काळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी सीताराम नालकर,
संदिप शिंदे,बाळासाहेब तारडे,शिवाजी नालकर,सुरेश तनपुरे,संजय पवार,सुरेश आदमने,बाळासाहेब जाधव,सोपान कोहकडे यांच्यासह आजी माजी कामगार उपस्थित होते.