मालकाने पगार न दिल्याने कामगाराने दूध डेअरी पेटवली ! झाले इतक्या लाखांचे नुकसान !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका दूध डेअरी कर्मचाऱ्याने डेअरीला आग लावल्याची घटना घडली आहे.

डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून गणेशवाडी येथील खाजगी दूध डेरी मध्ये काम करणार्‍या कामगार राहुल मोरे याने त्याच्या मालकाच्या दूध डेरी प्लांट चे कार्यालय ,

स्टोअर रूम ,जनरेटर रूम ला आग लावली.त्यात सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन कामगार राहुल मोरे ला अटक केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24