कामगारांना वेतनवाढ देण्यात यावी; २६ फेब्रुवारीला होणार निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने गठीत केलेल्या त्रिपक्षीय समितीची तिसरी बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत वेतनवाढीच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन चौथी बैठक २६ फेब्रुवारीला पुणे येथे घेण्यावर सर्वांनी सहमती दर्शविली.

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, साखर कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते. या त्रिपक्षीय समितीच्या पहिल्या व दुसऱ्या बैठकीत वेतनवाढीवर कोणतीच चर्चा नव्हती.

त्यामुळे तिसऱ्या बैठकीकडे राज्यातील साखर कामगारांचे लक्ष लागून होते. आजच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना ४० टक्के वेतनवाढ देण्याची एकमुखी मागणी केली.

त्यावर दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्याचे प्रतिनिधींची मते जाणून घेण्यासाठी वेळ मागितली. कामगार संघटनाचे प्रतिनिधींनी कारखानदारांशी चर्चा जरूर करा पण पुढची बैठक तातडीने आठ दिवसातच घ्या अशी मागणी केल्याने पुढील बैठक २६ फेब्रुवारीला पुण्यात घेण्याचे निश्चित केले.

अहमदनगर लाईव्ह 24