अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे,अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे दोन दिवसात २२ जणांना जीव गमवावा लागला. 

रूग्णवाढीसोबतच मृत्यूचा आकडा देखील प्रतिदिन वाढतच आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात २२ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

आतापर्यंतच्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मुळे तब्बल ६७५२ मृत्यू झाले आहेत. आज (सोमवारी) ५८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या ३,२६,८८४ झाली आहे.

जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे.

आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार १११ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५९ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधीत आढळले.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,२६,८८४

उपचार सुरू असलेले रूग्ण:५१११

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७५२

एकूण रूग्ण संख्या:३,३८,७४७

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)