चिंताजनक : राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- म्युकरमायकोसिस आजाराचे रूग्ण नगर शहरात आढळून येत आहेत, परंतुु, त्यासाठी आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा मुद्दा कान, नाक, घसा तज्ज्ञांनी (ईएनटी) मनपात झालेल्या बैठकीत उपस्थित केला.

म्युकरमायकोसिस आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आरोग्य समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कान, नाक, घसा तज्ज्ञ व डेंटल सर्जन यांची संयुक्त बैठक झाली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे बोलत होते.

यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, समितीचे सदस्य सचिन जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,

बाळासाहेब पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, डॉ. गजानन काशीद, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. संजय आसनांनी,डॉ. योगेश बुधानी, डॉ. मंगेश जाधव, डॉ. राहुल आनंद, डॉ. विजयनाथ गुरुवाले उपस्थित होते.

म्युकरमायकोसीस हा आजार कोरोना पेक्षा भयंकर आहे. जीवघेणा आहे, या आजाराचे रुग्ण राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजार संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, अशी सूचना डाॅक्टरांनी मांडली.

अहमदनगर लाईव्ह 24