अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संकटात आता आणखी एक भर वाढली आहे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढले आहेत श्रीरामपूर तालुक्यात म्युकरमायकोसिस
या आजाराने प्रवेश केला असून तालुक्यात 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्या लाटेने हाहाकार करुन सोडला होता.
त्यात आता म्युकरमायकोसिस हा आजार नव्याने आला असून श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील 9 जणांना या आजारावर जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार सुुरु आहेत. म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे करोना विषाणूमुळे उद्भवते.
हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर वेळीच उपचार करणे फार महत्वाचे आहे. म्युकरमायकोसिस हा करोनापेक्षाही जास्त घातक ठरत आहे. यामागील कारण आहे की, करोना आपल्याला सांभाळून घेण्यासाठी वेळ देतो.
जर चांगल्या प्रकारे उपचार झाले तर 7 ते 21 दिवसांमध्ये रुग्ण यातून बाहेर पडू शकतो. बर्याचदा तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची गरज पडत नाही. काही औषधे आणि पथ्यांचे पालन केले तर केले तर रुग्ण घरीदेखील बरा होऊ शकतो. ज्याला होम क्वारंटाईन म्हणतात.
पण म्युकरमायकोसिस एवढा घातकअसून आपल्याला सांभाळून घेण्याची संधीही देत नाही. याचं मुख्य कारण आहे की म्युकरमायकोसिस परिणाम सर्वात आधी नाक आणि जबड्याच्या आजूबाजूला असणारे सायनसेस यावर होतो आणि तिथून डोळ्यांकडे पसरतो.
गंभीर परिस्थितीमध्ये मेंदूचा देखील समावेश होतो डोळे, जबडा, नाक हे मेंदूपासून खूप जवळ आहेत. काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला.
स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा तसेच करोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा.
केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.