अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- गुरुवारी राज्यात ८,९९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली आहे. ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
उर्वरित ८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर-१,जालना-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.