Smartphone Offer : तुम्ही आता फ्लिपकार्टवर सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहकांना रियलामी या भारतातील दिग्ग्ज टेक कंपनीचा स्मार्टफोन Realme 10 Pro Plus खरेदी करता येत आहे.
या स्मार्टफोनची मूळ किंमत 25,999 रुपये इतकी आहे. परंतु, तो तुम्ही आता फक्त 5,000 रुपयांना खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत असून एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हा स्मार्टफोन विकत घ्या. कारण अशी ऑफर पुन्हा मिळत नाही.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
कंपनीच्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात कंपनी 6.7-इंचाचा AMOLED वक्र डिस्प्ले देत आहे जो फुल एचडी + रिझोल्यूशनसह येतो. त्याचा 120Hz चा रिफ्रेश दर आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. वापरकर्त्यांना या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1080 SoC प्रोसेसर मिळत आहे आणि यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.
कंपनीने आपल्या वापकर्त्यांसाठी या स्मार्टफोनमध्ये एक शक्तिशाली कॅमेरा दिला आहे, जो उत्कृष्ट फोटो क्लिक करतो आणि त्यांची स्पष्टता चांगली आहे. यात क्वाड कॅमेरा सेटअप असून 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो शूटर दिले आहे.
जर फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाल्यास यात सेल्फी क्लिक करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये एक शक्तिशाली 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. 5000mAh बॅटरीसह या स्मार्टफोनमध्ये 67W चे फास्ट चार्जिंग उपलब्ध करून दिले आहे.