BSNL : भारीच की राव! फक्त 6 रुपयात मिळवा 3GB डेटा तेही 455 दिवसांसाठी, जाणून घ्या ऑफर

जर तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 455 दिवसांसाठी तुम्ही 3GB डेटा, मोफत कॉल स्वस्तात मिळवू शकता.

BSNL : बीएसएनएलचा एक असाच रिचार्ज प्लॅन आहे ज्यासाठी तुम्हाला फक्त 6 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या 6 रुपयात तुम्हाला आता 3GB डेटा, मोफत कॉल आणि SMS ची सुविधा मिळणार आहे. बीएसएनएल ही सरकारी दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनी सतत ग्राहकांच्या बजेटनुसार रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. कंपनी स्वस्तात रिचार्जचे प्लॅन ऑफर करत असल्याने ती रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या खासगी दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देत असतात. काय आहे कंपनीचा हा प्लॅन पहा.

खरं तर BSNL चा हा 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन आहे, ज्याची वैधता 455 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलसह दररोज 3GB डेटा दिला जात आहे. हे लक्षात घ्या की इतर कोणताही टेलिकॉम ऑपरेटर सध्या इतक्या कमी दराने वार्षिक प्लॅन देत नाही. हा प्लॅन सध्या फक्त जम्मू आणि काश्मीर वर्तुळात उपलब्ध आहे.

Advertisement

काय मिळतात फायदे

BSNL द्वारे सध्या ऑफर करण्यात आलेला सर्वात लांब-वैधता प्रीपेड प्लॅन 2,998 रुपयांचा आहे. यात 455 दिवसांची वैधता, दररोज 3GB डेटा, दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉल्स दिले जात आहेत. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 केबीपीएस इतका कमी होत आहे. तसे पाहिले तर या प्लॅनची ​​रोजची किंमत फक्त 6.59 रुपये असणार आहे.

कंपनीचा 2998 प्लॅनसाठी रिचार्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त BSNL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. “मोबाइल प्रीपेड प्लॅन्स” विभागांतर्गत जम्मू आणि काश्मीर सर्कल निवडावे लागणार आहे. सध्या हा प्लॅन केवळ जम्मू आणि काश्मीर सर्कलमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हीही या भागात राहत असाल तर तुम्ही हा प्लॅन वापरून पाहू शकता. तुम्ही यासाठी थेट BSNL वेबसाइटवर किंवा Mobikwik सारख्या थर्ड पार्टी अॅप्सद्वारे रिचार्ज करू शकता.

Advertisement