Lava Yuva 2 Pro : भारतीय बाजारात Lava च्या स्मार्टफोनचा दबदबा आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता या कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro लाँच केला आहे.
तुम्ही हा स्मार्टफोन ग्लास व्हाईट, ग्लास लॅव्हेंडर आणि ग्लास ग्रीन अशा तीन कलर पर्यायांमध्ये विकत घेऊ शकता. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये इतकी असणार आहे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना 12 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.
जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीच्या या फोनमध्ये तुम्हाला 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असणार आहे. समजा जर गरज भासली तर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या फोनची मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
कंपनीचा हा स्मार्टफोन MediaTek Helio G37 octa-core प्रोसेसरवर काम करतो. तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला स्क्रीन फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळत असून तुम्ही या फोनमध्ये दिलेल्या प्राइमरी कॅमेर्यासह 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह व्हिडिओ शूट करू शकता.
वापरकर्त्यांसाठी कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर काम करतो. कंपनीने कनेक्टिव्हिटीसाठी, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n/ac, हॉटस्पॉट, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखी शानदार फीचर्स प्रदान केली आहेत.