Smartphone Offer : भारीच की! या धमाकेदार ऑफरमध्ये OnePlus आणि Oppo च्या 5G फोनवर मिळत आहे 20 हजार रुपयांपर्यंतचा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offer : भारतीय बाजारात सध्या अनेक दिग्ग्ज कंपन्यांचे 5G स्मार्टफोन लाँच होत आहेत. या सर्वच 5G स्मार्टफोनमध्ये कंपन्या एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देत आहेत. काही दिवसांपूर्वी OnePlus आणि Oppo या दोन दिग्ग्ज कंपन्यांचे OnePlus 10R 5G आणि Oppo Reno 8T 5G हे स्मार्टफोन लाँच झाले होते.

आता याच स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मिळत आहे. तुम्हाला आता धमाकेदार ऑफरमध्ये 20 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता स्वस्तात जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे.

स्वस्तात मिळतोय OnePlus 10R 5G

8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. परंतु, आता तो तुम्ही Amazon च्या डीलमध्ये तुम्ही ते 34,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर 2,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफरही देत ​​आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर हा फोन 18,050 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. इतकेच नाही तर आता एका खास ऑफरमध्ये, कंपनी हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.7-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध करून देत आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर म्हणून कंपनी यात MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट देत आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप देत आहे. तसेच सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना देत आहे.

Oppo Reno 8T 5G वरही मिळत आहे ऑफर

कंपनीचा हा फोन Flipkart वर 23% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. स्टोरेजचा विचार केला तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. तुम्ही सेलमध्ये 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. PNB क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर यावर तुम्हाला रु. 1,000 ची अतिरिक्त सूट मिळेल.

तर दुसरीकडे, जर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला हा फोन 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहे. कंपनी या फोनवर 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज देत आहे. परंतु हे लक्षात घ्या की एक्सचेंज बोनस जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

कंपनीच्या या फोनमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले पाहायला मिळेल. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4800mAh बॅटरी दिली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.