Samsung Smartphone : सॅमसंगच्या एका स्मार्टफोनवर सगळ्यात मोठी सवलत मिळत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संधी काही वेळासाठीच असणार आहे. त्यामुळे स्वस्तात चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा हा फोन विकत घेण्याची संधी गमावू नका.
या फोनची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. सेलमध्ये तुम्हाला हा फोन 16,999 रुपयांना मिळत आहे. तसेच यावर इतर ऑफरमुळे तुम्ही तो फक्त 1,299 रुपयांना विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या SAMSUNG Galaxy F23 5G वर ही संधी मिळत आहे.
फक्त 1,299 रुपयात खरेदी करता येणार
इतकेच नाही जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केला तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. तसेच तुम्ही SBI क्रेडिट कार्डने व्यवहार केला तर तुम्ही एकूण 1,000 रुपये वाचवू शकता. तुमच्या जुन्या फोनसाठी तुम्हाला 15,700 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. समजा जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला तर तो तुम्ही फक्त 1,299 रुपयात विकत घेऊ शकता.
जाणून घ्या फीचर्स
कंपनी या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + इन्फिनिटी यू डिस्प्ले देत असून जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि वॉटरड्रॉप नॉच कटआउटसह येतो. कंपनीच्या या फोनचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G चिपसेटने सुसज्ज असणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये कंपनी 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देत आहे. फोन Android 12 वर आधारित आहे जो UI 4.1 वर काम करतो.
मिळेल दमदार बॅटरी
कंपनी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देत आहे. तसेच, कंपनी या फोनमध्ये 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी असून जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. एक्वा ब्लू, कॉपर ब्लश आणि फॉरेस्ट ग्रीन अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.