अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यामुळे जिल्हावासीयांना आता काहीसा दिलासा मिळू लागला आहे.
यातच जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एका तालुक्याने तर कौतुकास्पद काम केले आहे. हा तालुका म्हणजे श्रीगोंदा तालुका होय… नियमांचे पालन व योग्य नियोजनाच्या पार्शवभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वेग घटला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील २५ गावे व २१ वाड्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. तालुक्यात तब्बल १० हजार ८७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर १० हजार ११८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात १६ खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आले.
त्यामुळे १ हजार ५०० जणांना जीवदान मिळाले. दरम्यान कोरोनाच्या लढाईत महत्वाचे शस्त्र असलेले लसीकरण मोहीम देखील तालुक्यात युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. प्रशासनाने ३४ हजार ५०० नागरिकांचे लसीकरण केले आहे.
या आहेत तालुक्यातील कोरोनामुक्त २५ गावे व २१ वाड्या :- डोकेवाडी, गव्हाणेवाडी, कोकणगाव, चोराचीवाडी, भिंगाण, वेळू, टाकळी कडेवळीत, आधोरेवाडी, महादेववाडी, उक्कडगाव, रायगव्हाण, वडगाव, शिंदोडी, दाणेवाडी,
मेंगलवाडी, शिपलकरवाडी, अजनुज, आर्वी, जंगलेवाडी, म्हातारपिंप्री, पांढरेवाडी, लगडवाडी, भापकरवाडी, वेठेकरवाडी, घुटेवाडी, मुंगूसगाव, भानगाव, चिखली, कोरेगाव, घारगाव,
घोटवी, बांगर्डे, बनपिंपरी, थिटे सांगवी, उख्खलगाव, निंबवी, कोरेगव्हाण, सारोळा सोमवंशी, गव्हाणेवाडी, महादेववाडी (लोणी व्यंकनाथ), खेतमाळीसवाडी, शिरसगाव बोडखा, डोमाळेवाडी, चोरमलेवाडी, मासाळवाडी.