सांधेदुखी कारण ठरणाऱ्या चुकीच्या सवयी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- पुढे झुकून वजन उचलल्यास कंबरदुखी संभवते. यासाठी आपण पुढे झुकून वजन उचलू नये. विशेषकरून गॅस सिलिंडर, सोफा, पाण्याची बादली, धान्याची पोती, शटर, ग्रेट इ. कारण बहुतेक स्लिप डिस्ककेस या वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलल्यामुढेच होतात.

हे युग आजारांच्या दृष्टीने लोकांसाठी त्रासदायक आहे. यात सांध्यांच्या समस्या जास्त आहेत. सांधे म्हणजे जिथे दोन वा दोनपेक्षा जास्त हाडे असतात.

उदा. गुडघे वा मनगटाचे सांधे. आज आपण आपल्या सांध्यात समस्या निर्माण करून नंतर वेदना निर्माण करणाऱ्या वाईट सवयी कोणत्या आहेत ते पाह्या.

कारण या सवयी थोड्या जरी सुधारल्या तरी अनेक सांधेदुखीच्या समस्यांपासून स्वत:ला वाचवता येऊ शकते व एक वेदनारहित दीर्घायुष्य जगता येऊ शकते.

मोबाइलवर बोलताना :- मोबाइल आल्यानंतरही अनेक प्रकारच्या सांधेदुखी वाढल्या आहेत. ज्यात मुख्यत्वे मनगटाचे सांधे, अंगठा दुखणे, बोटांच्या सांध्यात वेदना व मानदुखी आहेत. मोबाइल वापरणाऱ्यांनी कमीत कमी टायपिंग आपल्या अंगठ्याने करावे. टायपिंगसाठी व्हॉइस टेक्स्टचा वापर करू शकता.

जेणेकरून मनगट, अगठा व बाटाच्या साध्याना आराम मोबाइल वापरताना मान झुकवू नये. झुकवल्यामुळे आपली स्पाइन कर्व्ह गडबडते व ते मानेत दुखणे उत्पन्न करते. याला सर्व्हायकल स्पाँडिलिसिस म्हणतात. यात व्यक्‍तीची मान व हातांत वेदना, हातामध्ये बधिरपणा, हात गरम लागणे व हातांमध्ये मुंग्या येणे अशी लक्षणे उत्पन्न होतात.

वजन चुकीच्या पद्धतीने उचलणे :- जड बॅग चुकीच्या पद्धतीने उचलल्यास कंबर व खांदे दुखू शकतात. कारण यामुळे आपली स्पाइन कर्व्ह गडबडते व हे स्लिप डिस्क वा सर्व्हायकल स्पाँंडिलिसिस वा सायटिकासारख्या वेदना देऊ शकते. पुढे झुकून वजन उचलल्यास कंबरदुखी संभवते. यासाठी आपण पुढे झुकून वजन उचलू नये. विशेषकरून गॅस सिलिंडर, सोफा, पाण्याची बादली, धान्याची पोती, शटर, गेट इ. कारण बहुतेक स्लिप डिस्ककेस या वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलल्यामुळेच होतात.

अचूक मापाचा बूट न घालणे :- उंच हीलचे बूट घालणे घोटा, घोटा, गुडया व कंबरेच्या सांध्यासाठी घातक असते. जेव्हा दीर्घकाळ असे बूट घालतो, तेव्हा ते हे सांधे विकृत करतात, तसेच सांध्यांचे रोगही उत्पन्न करतात. घासलेल्या तळाच्या चपला वा बूट॒ घातल्यासही या सांध्यांवर दुष्परिणाम होतो.

यासाठी गुडघे, घोटे व कंबरेचे दुखणे टाळण्यासाठी आपण सपाट वा पायांच्या आकारांना सर्पोट करणारेच बूट वा सँडल वापरायला हवेत. आपल्याला काहीच दिवसांपासून घोटे, गुडघे व कंबरेत दुखणे सुरू झाले असेल व आपण काही दिवसांपूर्वीच नवा बूट खरेदी केला असेल तर त्या बुटामुळेच गुडघे व इतर सांधे दुखत असण्याची जास्त शक्‍यता आहे. असे असल्यास त्वरित ते बूट घालणे सोडून द्या. यामुळे आपल्याला सांधेदुखी पासून आराम मिळेल.

उना पासून दूर सहणे:- उन्हापासून दूर राहणे ही सांधेदुखीचे एक मोठे कारण आहे. कारण हाडांच्या आरोग्यासाठी हवे असणारे व्हिटॅमिन-डी आपल्याला उन्हातूनच मिळते. आपण उन्हात बसलो नाही, तर शरीरात व्हिटॅमिन-डीची उणीव राहील. ज्या मुळे हाडे व सांधे कमकुवत होतील. असे दीर्घकाळ राहिल्यास ऑस्टियोआर्थरायटिस व ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24