Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Xiaomi 13 Ultra : अखेर ठरलं! ‘या’ दिवशी लॉन्च होणार 50MP सोनी IMX989 सेन्सर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

लवकरच मार्केटमध्ये Xiaomi चा Xiaomi 13 Ultra हा स्मार्टफोन धुमाकूळ घालताना दिसणार आहे. कारण या फोनची लॉन्च तारीख जाहीर झाली आहे.

Xiaomi 13 Ultra : Xiaomi च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आगामी स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. कंपनी आपला आगामी Xiaomi 13 Ultra हा फ्लॅगशिप फोन मार्केटमध्ये लाँच करणार आहे.अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

माहितीनुसार कंपनी हा फोन पुढच्या आठवड्यात म्हणजे 18 एप्रिलला लाँच करणार आहे. लाँच झाल्यानंतर हा फोन iQOO च्या स्मार्टफोनला टक्कर देऊ शकतो. इतकेच नाही तर लाँच पूर्वीच या फोनचे तपशील लीक झाले होते. या लीक नुसार कंपनी आगामी फोनमध्ये चार जबरदस्त कॅमेरे देणार आहे.

लीक झालेली माहिती समोर आली असून कंपनीच्या या फोनमध्ये 6.7-इंचाचा E6 AMOLED LTPO डिस्प्ले क्वाड HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. हे Snapdragon 8 Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित असणार आहे. कंपनीचा हा फोन Android 13 OS आणि MIUI 14 सह असणार आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असणार आहे.

काय असणार आगामी Xiaomi 13 Ultra चे फीचर्स?

कंपनीचा हा फोन 90W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येण्याची शक्यता आहे. परंतु अजूनही आतापर्यंत त्याच्या बॅटरी क्षमतेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. या फोनमध्ये 6.7-इंचाचा E6 AMOLED LTPO डिस्प्ले असणार आहे, जो Quad HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. जो Snapdragon 8 Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित असणार आहे.

कंपनीच्या आगामी Xiaomi 13 Ultra मध्ये चार कॅमेरे असणार आहे आणि मुख्य शूटरसाठी 1-इंच 50MP Sony IMX989 सेन्सर राखून ठेवले आहे. हा कॅमेरा कंपनीच्या 12S Ultra मध्ये वापरला होता. कंपनीचा हा फोन Android 13 OS आणि MIUI 14 सह असणार आहे. तसेच व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे.