Xiaomi 12 Pro Price Drop : दिग्ग्ज टेक कंपनी Xiaomi ने आपल्या चाहत्यांना भेट दिली आहे. कंपनीने Xiaomi 13 Pro लॉन्च केला. परंतु, आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Xiaomi 13 Pro लॉन्च होताच कंपनीने आपल्या एका फ्लॅगशिप फोनची खूप किंमत कमी केली आहे.
या स्मार्टफोनवर कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे. जर तुम्हाला तो स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला किंवा Amazon ला भेट द्यावी लागणार आहे. कंपनी आपल्या Xiaomi 12 Pro या फ्लॅगशिप फोनवर सूट देत आहे.
कंपनीकडून Xiaomi 12 Pro च्या किमतीत एक दोन हजार नव्हे तर 10,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. कंपनीचा फ्लॅगशिप हा फोन 50MP + 50MP + 50MP कॅमेरा सेटअपसह येतो. 1 मार्चपासून म्हणजे उद्यापासून ग्राहकांसाठी त्याची किंमत कमी होणार आहे.
जाणून घ्या किंमत
आता भारतीय बाजारात, Xiaomi 12 Pro चे दोन्ही प्रकार 8GB + 256GB आणि 12GB + 256GB मध्ये कमी किमतीत उपलब्ध असणार आहेत. त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची नवीन किंमत 52,999 रुपये तर, त्याच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेजची नवीन किंमत 56,999 रुपये झाली आहे.
उपलब्ध आहेत ऑफर
Xiaomi 12 Pro ची किंमत कमी करण्यासोबतच त्यावर इतर अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तो आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. समजा जर तुम्ही HDFC कार्ड वापरून Xiaomi 12 Pro चे कोणतेही दोन प्रकार घेतले तर तुम्हाला त्याच्या किंमतीवर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे.
इतकेच नाही तर तुम्ही जुना फोन बदलल्यावर 3000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. या सवलतींमुळे हा फोन तुमच्यासाठी 6000 रुपयांच्या आणखी सवलतीसह उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही Redmi किंवा Xiaomi स्मार्टफोन वापरकर्ते असाल आणि तुम्हाला हा फोन विकत घेतल्यावर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.
अशा प्रकारे तुम्हाला HDFC कार्ड आणि एक्सचेंज बोनस अंतर्गत एकूण 8000 रुपयांची सूट मिळेल. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही Mi च्या वेबसाइट किंवा Amazon वरून विकत घेऊ शकाल. नवीन किंमत आणि ऑफरसह, Xiaomi 12 Pro 1 मार्च 2023 पासून उपलब्ध होणार आहे.