‘या’ 5 सुपर स्टॉकने दिले 90 टक्के रिटर्न्स; गुंतवणूकदार झाले मालामाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शेअर बाजारात टॉप-5 शेअर्समधल्या एका शेअरनं 90 टक्क्यांचे मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत.

बाकी शेअर्समध्येही 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन शेअर बाजार बंद झाला. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यात सर्वांत जास्त रिटर्न दिलेल्याआणि गुंतवणूकदारांना मालामाल केलेल्या टॉप 5 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत.

सचेता मेटल्स लिमिटेड (Sacheta Metals Ltd.) – 90.79% BSE :- सेन्सेक्समध्ये ट्रेंड होणाऱ्या सचेता मेटल्स शेअरनं गेल्या आठवड्यात 90 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

गेल्या आठवड्यात क्लोजिंगवर या शेअरची किंमत 19.55 रुपये होती. गेल्या आठवड्यातल्या क्लोजिंग स्टॉकमध्ये त्याची किंमत 37.30 रुपये होती.

या हिशेबाने गेल्या आठवड्यात कुणी या स्टॉकमध्ये 1,00,000 रुपये गुंतवले असतील, तर त्याची किंमत 1,90,000 रुपयांपेक्षाही जास्त झाली असती.

एके स्पिनटेक्स लिमिटेड (AK Spintex Ltd.) – 85.31% :- टेक्स्टाइल इंडस्ट्रीजमधल्या ए. के. स्पिंटेक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत 85.31% वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 28.25 रुपयांवर या स्टॉकचं क्लोजिंग झालं होतं.

या आठवड्यात या स्टॉकचं क्लोजिंग 52.35 रुपयांवर झालं. म्हणजेच एकूण 85 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ आहे. गेल्या आठवड्यात या स्टॉकमध्ये कुणी 1,00,000 रुपये गुंतवले असतील तर या आठवड्यात 1,85,000 रुपयांपेक्षाही जास्त झाले असते.

केआयएफएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (KIFS Financial Services Ltd.) – 80.11% :- गेल्या शुक्रवारी म्हणजे 31 डिसेंबरला हा स्टॉक 43.50 रुपयांवर बंद झाला होता. या आठवड्याचं क्लोजिंग 78.53 रुपयांवर झालं आहे.

या हिशेबानं यामध्ये 80 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. एका आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये कुणी एक लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत एक लाख 80 हजार रुपये मिळाले असते.

नरेंद्र प्रॉपर्टीज लिमिटेड (Narendra Properties Ltd.) – 76.98% :- 31 डिसेंबर 2021पर्यंत हा स्टॉक 20.20 रुपयांवर बंद झाला होता.

सात जानेवारीला त्याचं क्लोजिंग 35.75 रुपयांवर झालं आहे. म्हणजेच एकूण 76.98 टक्क्यांची वाढ आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत त्यांना एक लाख 76 हजार परत मिळाले असतील.

ट्रानवे टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Tranway Technologies Ltd.) – 72.18% :- 31 डिसेंबरला 6.65 रुपयांवर हा स्टॉक क्लोज झाला होता तर 7 जानेवारीला तो 11.45 रुपयांवर क्लोज झाला. म्हणजे या स्टॉकनेही एका आठवड्याच्या आतच एक लाख रुपयांवर एक लाख 72 हजार रुपये परतावा दिला आहे.