अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळून तो लवकरात लवकर बरा व्हावा, हाच अट्टहास कायम राहिलेला आहे.
याच दृष्टीकोनातून केवळ सामाजिक बांधिलकीतून आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथील आरोळे कोविड सेंटरला बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट दिल्या.
आ. पवार हे नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सतत कार्यरत आहेत. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी तो परतावा, यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यास आपण कटिबध्द आहेत.
असेही ते म्हणाले. याच दृष्टिकोनातून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन काल आरोळे कोव्हीड सेंटरला सुपूर्द केल्या.
कोरोनाबाधित रुग्णावर केल्या जाणा-या उपचारपध्दतीतील ऑक्सीजन थेरपीसाठी ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर उपकरण अतीशय उपयुक्त ठरणार आहे.
यापैकी काही उपकरणांसाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरच्या’ (MCCIA) वतीने मदत झाली असल्याचेही ते म्हणाले.