आषाढी वारीबाबत उद्धव महाराज मंडलिक यांनी घेतलेल्या भुमीकेचे ‘ या’ गावाने केलं समर्थन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- वारकरी संप्रदायमध्ये विनाकारण घुसखोरी करून संप्रदायाला  विस्कटविण्याचा प्रयत्न सद्या काही लोक करीत आहेत अश्या प्रव्रुत्तीना योग्य उत्तर देण्याची ताकद या संप्रदाय मध्ये आहे. ऐन वेळी उभे राहिलेल्या सोंगाप्रमाणे टिव्हीच्या कॅमेरयासमोर येऊन वाटेल

ते बरळणारे काही बरळले तरी खरा वारकरी संप्रदाय देशावर राज्यावर आलेल्या कोरोना च्या संकटात लोकहिताच्या बाजूने उभा आहे अशी परखड भूमिका जगतगुरु तुकाराम महाराज देवस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी व्यक्त केली आहे.

याच भूमिकेचे मानोरी (ता.राहुरी)येथील भक्त परिवाराकडून मोठ्या प्रमाणात समर्थन करण्यात आले आहे. सध्या देशावर तसेच राज्यावर ओढवलेल्या कोरोनाचे संकटामुळे आगामी आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर यात्रेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महंत उद्धव महाराज यांनी जोरदार समर्थन केले आहे.

यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी आषाढी वारी संदर्भामध्ये सुतोवाच करताना सांगितले की आषाढी वारी ही शासनाने सुचवल्याप्रमाणे व्हावी अशी भूमिका आमच्या सर्व संतांची आहे मात्र नको ते सोंग नको ती भूमिका विविध माध्यमातून मांडली जात आहे,खरे वारकरी बाजुला राहिले,ज्यांनी कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही,कधी वारी केली नाही अशी माणसं कॅमेरा समोर येऊन वाटेल तसे बरळत आहेत.

ही मोठी शोकांतिका आहे. मात्र आम्ही लोकहिताची भूमिका मांडणारे आहोत.वारकरी संप्रदायामध्ये घुसून हा संप्रदाय विसकटण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याला योग्य उत्तर देण्याची ताकद या संप्रदायामध्ये आहे असा परखड इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

आम्ही केंद्र व राज्य शासनाच्या योग्य निर्णया सोबत आहोत. कोणतेही संत आतताईपना करणारे नाहीत. या आडून सर्वच पक्षातील व संघटनेतील कोणीही राजकारण करून वारकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये.

शासनाने घालून दिलेले निर्बंध हे सर्वसामान्य वरकाऱ्यांचे आरोग्याचे रक्षण करणारे व हिताचे आहेत याची जाणीव असल्याने शासनाने आषाढी वारी बाबत घेतलेले निर्णयाशी आम्ही सहमत असल्याचे महंत उद्धव महाराज यांनी सांगितले.

याच निर्णयाचे ठिकठिकाणहुन आता समर्थन होऊ लागले आहे.मानोरी येथील ह.भ.प. संभुगिरी महाराजगोसावी.ह.भ.प किशोर महाराज जाधव, मा.उपसभापती रवींद्र आढाव,सरपंच आब्बास शेख दयावान, तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तम आढाव, पोलीस पाटील भाऊराव आढाव,डाॅ. राजेंद्र पोटे,भाऊसाहेब आढाव,निवृत्ती आढाव, डॉ. बाबासाहेब आढाव, शामराव आढाव,

नवनाथ थोरात,पिरखाभाई पठाण, नानासाहेब तनपुरे,चंद्रभान आढाव, के. बि. शेख, सोपान पिले, बापूसाहेब वाघ,आबासाहेब पोटे,विलास धसाळ, सागर नेहे आदिंसह नागरीकांनी सदर निर्णयाला नागरीकांनी समर्थन दर्शविले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24