‘या’ क्रिकेटपटूने पुण्यात सुरू केली मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत.

पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू झाली,

अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजनसिंग याने ट्विट करून दिली.

ट्विटमध्ये हरभजनने म्हटले आहे की, आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत.

मला आशा आहे की, वाहेगुरू सर्वांना सुरक्षित ठेवतील. आपण कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.

ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात १५०० नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल.

या मदतीमुळे कोरोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये लोकांना मोफत चाचणी करता येईल, तर काही लोकांना ५०० रूपये खर्च येऊ शकतो.

२००७ आणि २०११ च्या वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाचा सदस्य राहिलेल्या हरभजन सिंगने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यांत ४७१, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला, तर त्याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24