Yamaha Neo EV Scooter : देशात पेट्रोलच्या किमती वाढल्या असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वाहने सादर करत असतात. अशातच आता Yamaha आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
यामाहाची ही स्कुटर ओलाला टक्कर देईल. परंतु जर तुम्हाला ही नवीन स्कुटर खरेदी करायची असेल तर जरा थांबा, कारण मार्केटमध्ये अजून ही स्कुटर लाँच झाली नाही. तसेच या स्कुटरच्या किमतीचाही कंपनीने कोणता खुलासा केला नाही.
जबरदस्त रेंज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इको आणि स्पोर्ट्समध्ये वेगवेगळे मोड वापरकर्त्यांना मिळणार आहेत. ते फक्त सिंगल चार्जवर 60 किलोमीटरपेक्षा जास्त चालेल. यामाहा निओला पुढच्या बाजूस KYB टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक दिला जाणार आहे. त्यामुळे रायडरचा प्रवास सुखकर होऊन तसेच खराब रस्त्यावरही कमी धक्के जाणवतील.
वापरकर्त्यांना मिळणार डिस्क-ड्रम सेटअप
सुरक्षेसाठी कंपनीकडून यात डिस्क-ड्रम सेटअप देण्यात आला आहे. तसेच त्याच्या हँडलबारवर डिजिटल सेटअप उपलब्ध असणार आहे. यामाहा निओमध्ये कीलेस स्टार्ट आणि मोठी एलसीडी स्क्रीन उपलब्ध असणार आहे. इतकेच नाही तर यात Yamaha MyRide अॅपची सुविधा मिळणार आहे. ज्याद्वारे ड्रायव्हर स्मार्टफोनला दुचाकीशी जोडेल. हे कन्सोल गती, बॅटरी चार्ज पातळी, वेळ, फोन कॉल तसेच संदेश सूचना प्रदर्शित करत आहे.
मिळणार 13-इंच अलॉय व्हील्स
सध्या, कंपनीने नवीन स्कुटरची किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल अजून कोणताही खुलासा केला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही स्कुटर डिसेंबर 2023 पर्यंत भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्कुटरची किंमत 2.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम असेल. तसेच यात LED हेडलाइट, 13-इंच अलॉय व्हील्स, 135 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 27 लीटर अंडरसीट स्टोरेज मिळू शकते. ग्राहकांना ही स्कुटर मिल्की व्हाइट, मिडनाईट ब्लॅक आणि एक्वा अशा तीन रंग पर्यायात खरेदी करता येईल.