Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Yamaha R7 Bike : 689 cc इंजिन आणि शानदार लुकसह लाँच होणार ‘ही’ बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Yamaha R7 Bike : वाहन निर्माता कंपनी यामाहा आपल्या बाईकमध्ये डिझाइन्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यासाठी मार्केटमध्ये ओळखली जाते. यामाहाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीच्या एका धमाकेदार बाईकची बाजारात लवकरच एंट्री होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

689 cc इंजिन आणि शानदार लुकसह ही बाईक लाँच होणार आहे. इतकेच नाही तर या बाईकमध्ये कंपनी 6-स्पीड गिअरबॉक्स देणार आहे. त्यामुळे लाँच झाल्यानंतर ही बाईक इतर कंपन्यांना टक्कर देईल. जाणून घेऊयात या बाइकबद्दल सविस्तर.

डबल डिस्क ब्रेक मिळण्याची शक्यता

या बाईकमध्ये डबल डिस्क ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीकडून यात ट्यूबलेस टायर आणि दोन सिलिंडर मिळणार आहेत. यात उपलब्ध असणाऱ्या दुहेरी सिलिंडरमुळे तो रस्त्यावर जलद चालेल. कंपनीच्या या बाईकची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात येईल. ही बाईक ग्राहकांना आता 1 प्रकार आणि 2 रंग पर्यायात खरेदी करता येईल.

वजन आणि इंधन टाकी

कंपनीच्या या बाईकचे एकूण वजन 188 किलो इतके असून त्यात 13 लीटरची इंधन टाकी आहे. ही बाईक जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असून अजूनही या कंपनीने भारतात लॉन्चची तारीख तसेच किमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही. परंतु डिसेंबर 2023 पर्यंत ती भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध असणार 6-स्पीड गिअरबॉक्स

या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध असून यात 41mm KYB USD फोर्क्स तसेच मोनोशॉक सस्पेंशन मिळत आहे. ड्युअल चॅनल ABS देखील असून जे रस्त्यावर सुरक्षित प्रवास करते. या बाईकमध्ये स्टायलिश फ्युएलटँक, मोठा विंडस्क्रीन तसेच सिंगल एलईडी प्रोजेक्टर देण्यात आला आहे. लाँच झाल्यानंतर ही बाईक Aprilia RS 660, Honda CBR650R आणि Kawasaki Ninja 650 ला टक्कर देईल.