संगमनेर मध्ये यंदाही श्रावण मासातील यात्रा प्रशासनाकडून रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-श्रावण मासात संगमनेर तालुक्यातील शिव मंदिरात मोठ्या प्रमाणावर यात्रा भरवल्या जातात. परंतु दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व देवस्थान ट्रस्टींनी यंदाही सर्वच यात्रा रद्द केल्या आहेत.

तालुक्यात प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने मंदिर परिसरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानने केले. आज श्रावण मासातील पहिला सोमवार असल्याने

तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर व कपालेश्वर मंदिर, पठारातील बाळेश्वर येथील श्रीक्षेत्र बाळेश्वर देवस्थान, कोकणगाव येथील निझर्नेश्वर देवस्थान, धांदरफळचे रामेश्वर देवस्थान व अन्य शिव मंदिरात भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. काही मंदिराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24