होय ! हे खरे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चालते फक्त महीलाराज…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- आज संपूर्ण देशभर महिलादिन उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचे कौतूक केले जात आहे.महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली जावी, असा मुद्दा समोर येत आहे.

मात्र, अजूनही अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात नाहीत. जसे राजकीय क्षेत्रात तर महिलांचे प्रमाण खुपच कमी आहे.

ग्रामीण भागात ही परिस्थिती वाईट आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र  अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाचा सर्व कारभार फक्त महिलाच पाहतात.

गावच्या सरपंचापासून ते अनेक समित्यांवर फक्त महिलाच सदस्य आहेत. ते गाव म्हणजे नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे. या गावाचा सर्व कारभार महिलांकडे आहे.

गावाच्या सरपंच महिलाच असल्यामुळे गावाचे विकासविषयक निर्णय महिलेकडूनच घेतले जातात. तसेच, सरपंचपदच नव्हे तर या उपसरपंचपदसुद्धा गावातील महिलेकडेच आहे.

म्हणजे, राजकारण हा महिलांचा प्रदेश नाही असे म्हणून आजवर त्यांना डावलण्याचा प्रयत्न होत झाल्याची अनेक उदाहरणे असताना,देखील या गावात राजकारण आणि समाजकारणाचा गाडा फक्त महिलाच हाकतात.

या गावात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या महिलाच आहेत. मोरयाचिंचोरे या गावाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यसुद्धा महिलाच असल्यामुळे गावातील सर्व समित्यांमध्ये महिलांचीच नियुक्ती केलेली आहे.

येथील वाचनालय समितीमध्ये सर्व महिला सदस्य आहेत. तसेच, वनरकक्षण कमिटी, आदर्शगाव कमिटी, तंटा मुक्ती समिती, स्वच्छता समिती,

शाळा व्यवस्थापन समिती या समित्यांच्या प्रमुखही महिलाच आहेत. गावातील सर्व विकासकामांचे तसेच समारंभाचे उद्धाटनसुद्धा महिलांच्याच हस्ते करण्यात येते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24