Maruti Alto 800 CNG : देशात सीएनजीवर चालणाऱ्या कारची मागणी वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परंतु, तुम्हीही अजूनही या कार कमी किमतीत खरेदी करू शकता.
तुम्ही मारुती अल्टो 800 सीएनजी ही कार केवळ 62 हजारांत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या कारला जबरदस्त मायलेज मिळत आहे. या फायनान्स प्लॅन नेमका काय आहे? ते जाणून घेऊयात.
किंमत
या कारची सुरुवातीची किंमत ही 5,03,000 रुपये इतकी आहे. तर ऑन-रोड हीच किंमत ही 52 हजार रुपयांनी वाढून 5,55,187 रुपये इतकी आहे.
फायनान्स प्लॅन
जर तुम्हाला ही कार कॅश पेमेंटने विकत घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे 5.5 लाख रुपये गरजेचे आहे. जर तुमच्याकडे एवढी रक्कम नसेल तर तुम्ही 62 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट भरून विकत घेऊ शकता.
डाउन पेमेंटसाठी तुम्हाला बँकेकडून 4,93,187 रुपयांचे कर्ज मिळेल आणि या कर्जाच्या रकमेवर बँक वर्षाला ९.८ टक्के व्याज आकरत आहे. कर्ज जारी केल्यानंतर, तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा 10,430 रुपये इतका EMI महिन्याला जमा करावा लागेल.
इंजिन आणि ट्रान्समिशन
ही कार 796 सीसी तीन सिलिंडर इंजिनने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने युक्त आहे. त्यामुळे हे इंजिन 40.36 PS पॉवर आणि 60 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
मायलेज
मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीचा असा दावा आहे की ही कार 31.59 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.