ताज्या बातम्या

Business Idea : कमीत कमी गुंतवणुकीत कमावू शकता तुम्ही जास्त पैसे, कसे ते जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : जर तुम्ही जास्त पैसे कमावण्याच्या विचारात असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहे. कारण तुम्ही आता कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त पैसे कमावू शकता.

केंद्र सरकार तुम्हाला व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता. तसेच बक्कळ पैसेही आरामात मिळवू शकता.

देशात सरकारने 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असून आता प्लास्टिकच्या वस्तू बाजारातून नाहीशा होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्लास्टिक स्ट्रॉ. सध्या शीतपेयांची मागणी खूप वाढत असून शासनाच्या या निर्णयामुळे प्लास्टिक स्ट्रॉऐवजी कागदी स्ट्रॉची मागणी वाढली आहे.

नियम 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) पेपर स्ट्रॉ युनिटवर प्रकल्प अहवाल तयार केला असून आता पेपर स्ट्रॉ बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सरकारकडून मान्यता आणि नोंदणी आवश्यक असणार आहे.

या प्रकल्पासाठी GST नोंदणी, उद्योग आधार नोंदणी (पर्यायी), उत्पादनाचे ब्रँड नाव आवश्यक असू शकते. तसेच एनओसीसारख्या मूलभूत गोष्टी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक असणार आहेत. स्थानिक महापालिका प्राधिकरणाकडून व्यापार परवाना घ्यावा लागणार आहे.

आवश्यक खर्च

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला 19.44 लाख रुपये खर्च करावे लागतील. एकूण रकमेपैकी तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 1.94 लाख रुपये खर्चावे लागणार आहेत. उर्वरित 13.5 लाख रुपयांचे तुम्हाला मुदत कर्ज घेता येते.

तसेच खेळत्या भांडवलासाठी 4 लाखांचे वित्तपुरवठा करता येईल. हा व्यवसाय 5 ते 6 महिन्यांत सुरू होईल. तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी पीएम मुद्रा कर्ज योजनेतूनही तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता.

मोठ्या प्रमाणात आहे मागणी

लहान रस व्यवसायापासून ते मोठ्या डेअरी कंपन्यांपर्यंत स्ट्रॉला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाबाबत लोकांमध्ये होत असलेल्या जागृतीमुळे पेपर स्ट्रॉची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

या वस्तु आवश्यक 

याच्या कच्च्या मालासाठी तीन गोष्टी गरजेच्या आहेत. त्यासाठी फूड ग्रेड पेपर, फूड ग्रेड गम पावडर आणि पॅकेजिंग साहित्य खूप गरजेचे आहे. शिवाय, पेपर स्ट्रॉ बनवण्याचे यंत्र आवश्यक आहे. ज्याची किंमत सुमारे 900000 रुपये इतकी आहे.

होईल लाखोंची कमाई

या व्यवसायातून तुमची लाखोंची कमाई होऊ शकते. KVIC अहवालानुसार, जर तुम्ही 75% क्षमतेने पेपर स्ट्रॉ बनवण्यास सुरुवात केली तर तुमची एकूण विक्री 85.67 लाख रुपये होईल. यामध्ये, सर्व खर्च आणि कर घेतल्यानंतर, वार्षिक 9.64 लाख रुपये कमावतील. म्हणजेच महिन्याला तुमचे 80,000 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office