Business Idea : कुठेही सुरु करू शकता कमी खर्चात जास्त पैसे देणारा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : सध्या अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे अनेकजण व्यवसायाकडे वळू लागले आहेत. परंतु, अनेकांना कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा सुरु करायचा असतो. जर तुम्हीही अशाच व्यवसायाच्या शोधात असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे.

कारण तुम्ही आता तुमच्या शहरात किंवा गावात मोहरीच्या तेलाची गिरणी सुरू करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज पडत नाही. शिवाय याला जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत. हा व्यवसाय सुरु करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

पूर्वीच्या काळात मोहरीचे तेल काढण्यासाठी मोठमोठ्या यंत्रांची गरज पडत होती. परंतु,आता अनेक लहान मशिन्स आल्या आहेत. ज्याची किंमत कमी असून त्यांना जास्त जागेची आवश्यकता नाही. तसेच त्यांना चालवण्यासाठी जास्त श्रम खर्च करावे लागत नाहीत.

इतका येईल खर्च

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला ऑइल एक्सेलर मशीन विकत घ्यावी लागणार आहे. ज्याची किंमत 2 लाख रुपये असून त्याच्या उभारणीसाठी FSSAI कडून परवाना घ्यावा लागणार आहे. यासोबतच नोंदणीही करावी लागेल.

तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले नाही तर ते बेकायदेशीर मानले जाऊ शकते. संपूर्ण सेटअपसाठी सुमारे 3-4 लाख रुपये इतका खर्च येईल.या यंत्रात बिया एकत्र दाबून त्यातून तेल काढले जाते. या प्रकरणात तेल आणि साल वेगळी होते. साल विकूनही पैसे मिळू शकतात.

किती असणार उत्पन्न

तेल विक्रीसाठी ऑनलाइन मार्केटिंगचा उपयोग होऊ शकतो. हे तेल टिन किंवा बाटल्यांमध्ये पॅक करून विकले जाऊ शकते. या व्यवसायात फक्त एकदाच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही खूप पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office