Indian Railways : रेल्वेमध्ये करता येईल ‘असाही’ प्रवास, भरावा लागणार नाही एक्स्ट्रा चार्ज


अनेकजण दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन एक खास सुविधा सुरु करण्याच्या तयारीत आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railways : रेल्वेने अनेक नियम कडक केले आहेत. जर तुम्हीही दररोज रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण तुम्ही आता सामान्य तिकिटावर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागत नाही. काय आहे हा नियम आणि कोणाकोणाला हा प्रवास करता येतो, ते जाणून घेऊयात.

रेल्वे आता सामान्य तिकिटावर प्रवाशांना स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. याबाबत रेल्वे बोर्डानेही विभागीय प्रशासनाकडे अहवाल मागवला आहे.

जर रेल्वेचा हा निर्णय लागू झाला तर सामान्य तिकिटावर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा वृद्ध आणि गरीब व्यक्तींना होणार आहे. या लोकांना आता कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येईल .

मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय गाड्यांमध्ये सामान्य तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रेल्वेतील बहुतांश जागा रिकाम्या राहत आहेत त्याचे स्लीपर कोचमध्ये रूपांतर जनरल कोचमध्ये केले जाणार आहे.

या डब्यांवर अनारक्षित लिहिलेले असणार आहे. याशिवाय ते इतर स्लीपर कोचशी जोडले जातील. या डब्यांना मधले दरवाजे असतील. जनरल ते स्लीपर कोचमध्ये कोणीही प्रवासी जाऊ नये त्यासाठी ते बंद राहतील.