LIC Bima Ratna Scheme : भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी जुनी विमा कंपनी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीची पॉलिसी घेणार्या लोकांमध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्याच जणांचा समावेश आहे. यापैकीच एलआयसीची बीमा रत्न पॉलिसी लोकांसाठी खूप आहे.
यामध्ये जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर एकूण 50 लाखांपर्यंतचा परतावा मिळवू शकता. यात कोणतीही जोखीम नाही त्यामुळे अनेकजण एलआयसीच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. काय आहे एलआयसीची बीमा रत्न पॉलिसी जाणून घ्या सविस्तर.
काय आहे योजना ?
एलआयसी विमा रत्न योजना पॉलिसीधारकांना एकूण तीन प्रमुख फायदे देते जे मनी-बॅक गॅरंटी, रिच बोनस आणि डेथ कव्हर आहेत. या पॉलिसीची मुदत 15 वर्षे असून यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना त्यांच्या एकूण ठेव रकमेच्या 10 पट रक्कम मिळू शकेल.
पॉलिसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘गुंतवणूकदारांना पॉलिसीच्या 13व्या आणि 14व्या वर्षात 15 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी त्यांच्या गुंतवणुकीवर 25 टक्के परतावा देण्यात येतो.तर, 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी, 18व्या आणि 19व्या वर्षात गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 25 टक्के परतावा मिळतो आणि 25 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी, पॉलिसीच्या 23व्या आणि 24व्या वर्षात परतावा देण्यात येत आहे. ही योजना पहिल्या पाच वर्षांसाठी प्रत्येक रु. 1000 वर रु. 50 चा बोनस देत आहे, जे 6-10 वर्षांच्या दरम्यान रु. 55 पर्यंत वाढते आणि शेवटी परिपक्वतेनुसार रु. 60 पर्यंत वाढते.
ही योजना कमीत कमी 90 दिवसांच्या मुलाच्या नावावर मिळू शकते तसेच मोठ्या व्यक्तींना त्याचा लाभ घेता येतो. या योजनेत गुंतवणूकदारांना किमान 5 लाख रुपयांची गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. पेमेंट मोडला त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक म्हणून प्राधान्य दिले जाऊ शकते.