Online Fraud : तंत्रज्ञानामुळे जग अगदी जवळ आहे. कोणतीही कामे तंत्रज्ञानामुळे सोपी झाली आहेत. मग त्यामध्ये वीज बिल भरणे, तिकीट बुक करणे किंवा ऑनलाईन खरेदी करता येऊ लागली आहे. परंतु, असे जरी असले तरी या तंत्रज्ञानामुळे खूप फसवणूक होत आहे.
अनेकांचे लाखो रुपये काही मिनिटात गायब होत आहेत. त्यामुळे सावध असणे खूप गरजेचे आहे. या फसवणुकीपासून तुम्हीही सहज वाचू शकता पारंतू, त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. फसवणूक किंवा डेटा चोरी करणाऱ्या प्लॅटफॉर्मपासून स्वत:चे संरक्षण कसे करू शकतो याबाबत सरकारने माहिती दिली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर दिले आहे.
BIS ने ‘ऑनलाइन ग्राहक पुनरावलोकने, तत्त्वे आणि फ्रेमवर्क’ संदर्भात अधिसूचना जारी केली असून आता त्यानुसार, ई-कॉमर्समधील बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या पुनरावलोकनांपासून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. ही सूचना सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लागू आहे.
खोटा रिव्ह्यू देता येणार नाही
आता कोणीही प्लॅटफॉर्मवर बनावट रिव्ह्यू पोस्ट करू शकत नाही. अशा कंपनीसाठी सर्व मानकांचे पालन करणे अनिवार्य आहे. कोणत्याही व्यासपीठाने असे केले तर त्यांच्यावर कारवाई होईल. सरकारने जारी केलेली ही अधिसूचना ग्राहकांना गोपनीयता, सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदारी इत्यादींचा अधिकार देते.
BIS हे तपासते की या प्लॅटफॉर्मबद्दल योग्य रिव्ह्यू पोस्ट केला आहे की खोट्या पद्धतीने पोस्ट केला आहे. तुम्ही या पद्धती देखील जाणून घेऊ शकता. जेणेकरून तुम्हीही फसवणुकीचा बळी ठरणार नाही.
फॉलो करा या स्टेप्स