तालुक्यातील घोडेगाव येथील युवराज मारुती भोंडवे (वय २८) या तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत खर्डा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६० वर्षे) यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात सकाळी ६.३० वा. चे सुमारास त्यांचा पुतण्या युवराज मारुती भोंडवे याने जनावरांच्या गोठ्यातील पत्र्याच्या शेडच्या लाकडी वाशाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
मयत युवराज मारुती भोंडवे याच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी, एक मुलगा, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ आर के सय्यद, प्रविण थोरात हे करत आहेत.